शनिवार, १६ एप्रिल, २०११

आंबेडकर जयंती

बाबासाहेबांची जयंती १४ एप्रिल २०११ ला संपूर्ण जगात(भारतात म्हणणाऱ्या लोकांचा तो गैरसमज आहे) साजरी झाली आणि त्यांच्या जयंती महोत्सवानिमित्त खूप ठिकाणी विविध असे कार्यक्रम होतात.पण त्या निमित्ताने काही विचार होणे अगत्याचे ठरते .भारत नाव असलेला हा देश त्यांच्या विचारांवर चालायला का तयार नाही ? त्यांचे विचार चुकीचे तर नाहीत ना ? मित्रांनो मला असे वाटते  त्यांचे विचार क्रांतिकारक आहेत ते विचार पचवण्यास भारत देश सध्या तरी असमर्थ ठरलाय .इतकेच काय तर ते ज्या समाजात जन्माला आले तो समाज सुद्धा त्यांचे विचार पचवण्यास असमर्थ ठरलाय .ज्याने त्यांचे विचार मानले त्याची प्रगती नक्कीच झाली .ज्यांनी नाही मानले बाबासाहेबांच्या कार्यामुळे वास्तविक पाहता त्यांनी सुद्धा प्रगती केली .बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा ज्यावेळेस हि विचार करावा तेव्हा मोठ्या खेदाने म्हणावे लागते कि त्यांच्यावर लागलेला अस्पृश्यतेचा कलंक आजपर्यंतही गेला नाही .त्यांचे विचार न स्वीकारण्यामागे हे एक खूप मोठे कारण आहे .काही लोक म्हणतील अहो आता अस्पृश्यता शिल्लक नाही पण खेदाने म्हणावे लागते कि हे सत्य नाही.बाबासाहेब भ.बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हणतात 'मला दोन प्रश्न नेहमी विचारले जातात  ,पहिला असा कि मी इतके उच्च शिक्षण कसे घेऊ शकलो आणि दुसरा मी बुद्ध धम्माकडे का वळलो ,हे प्रश्न मला ह्या करता विचारण्यात येतात कारण मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो .' हि त्यांच्या मनाची कळकळ त्यांनी ह्या ठिकाणी मांडून दाखवली आहे .
        बाबासाहेब आंबेडकर इतका विद्वान माणूस हे तर सर्व लोकांनी मान्य केले त्या वेळेस हि आणि आजही मग त्याच्या हिंदुकोड बिलाला विरोध का ?त्याच्या धर्मांतराला विरोध का ?एवढे कमी पडले म्हणून कि काय बाबासाहेबांनी ज्या वेळेस धर्मांतर केले त्या वेळेस त्यांच्या समाजाला आरक्षण जाईल अशी काही लोकांनी का  भीती घातली ? बाबासाहेब खूप विद्वान आहेत ना मग त्यांचा धर्मांतराच निर्णय मूर्खपणाचा असू शकतो काय ?वा एका तोंडाने म्हणायचे कि बाबासाहेबांइतका बुद्धिमान कोणी नाही आणि दुसऱ्या बाजूने त्याला प्राणपणाने विरोध करायचा.त्यानंतर इतक्या बुद्धिमान माणसाला भारतरत्न हा किताब १९८९ साली द्यायचा .म्हणजे महापरिनिर्वाणानंतर २१,२२ वर्षांनी .वास्तविक पाहता त्यासाठीही व्ही.पी.सिंग यांच्या सरकारची वाट पहावी लागली तिथपर्यंत कॉंग्रेस झोपली होती कि काय ? नाही कॉंग्रेस झोपली नव्हती तर यालाच म्हणतात जातीयवाद .आजही आंबेडकरांच्या समाजाला हे लोक गुन्हेगार बनवण्याच्या मागे लागलेले आहेत .मुंबईला , नागपूरला ज्या वेळेस आंबेडकरांचा समाज जातो तेव्हा विना तिकीट जातो आणि त्यांना तिथे जाण्यास हेच सरकार मदत करते .बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही असा विचार केला नसेल कि माझा समाज माझ्यानंतर ५० वर्षांनी सुद्धा विना तिकीट प्रवास करेल त्यांची तर अपेक्षा होती कि माझा समाज तिथपर्यंत श्रीमंत होईल आणि चार चाकी गाडी मध्ये येईल.पण त्यांच्या पश्चात ना सरकारने त्या लोकांना पुढे येण्यासाठी खास असे प्रयत्न केले ना त्या लोकांनी कधी तशी इच्छा केली .आजही त्यांच्या समाजात कित्येक गटात विभाजन झालेले आहे.आणि त्यात कमी पडले म्हणून कि काय त्यांच्याच समाजातील पुढाऱ्यांनी त्यांना चुकीच्या वाटेवर लावले .जयंतीवर लाखो करोडोचा पैसा खर्च होऊ लागला ,ज्या बुद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने दिली त्याच्याच विरोधात परिणामी आंबेडकरांच्याच विरोधात हा समाज जाऊ लागला .बाबासाहेबांनी त्याचवेळेस सांगितले होते कि,' बुद्ध धम्मात दीक्षा माझ्यासाठी नाही तर तुमच्या प्रगती साठी आहे .' पण बुद्ध धम्माच्या विरोधात जाऊन त्या लोकांनी आंबेडकरांच्याच नावावर त्याला खपवणे सुरु केले .आणि ते अद्ययावत सुरु आहे. विशेष म्हणजे स्वतःला सुशिक्षित म्हणणारा समाज हि यांच्या मागे जातो .पुढारी म्हणजे कोणते तर ज्याने ,बुद्ध , फुले ,कबीर , बाबासाहेबांचे  एकही पुस्तक ज्याने वाचले नसेल असे अनेक पुढारी आहेत .आणि ज्यांनी वाचले आहेत ते बिचारे तर फक्त बोलणार किंवा लिहिणार पण स्वतः काही मैदानात येणार नाही.
            भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तरवारीचे त्यांच्या न्यारेच टोक असते.मोठा प्रश्न पडतो कि इतके सारे स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे लोक क्रांती करू शकत नाही.तर त्या वेळेस लक्षात येते कि ,ह्या पैकी खोटारडे लोकांची संख्या खुपच जास्त होऊन बसली आहे . व ज्यांना क्रांती करायची इच्छा आहे त्यांना व्यवस्थित संघटना मिळत नाही.सर्व भ्रष्ट संघटना आहेत .यांच्यात चांगले माणसाचेहि मरण होत आहे .त्यांनी तर आशाच सोडलीय .बारकाईने विचार केला तर लक्षात येईल कि .खरे म्हणजे हे लोक धर्मांतर करायला तयारच नाहीत.हे फक्त नामांतर करायला तयार आहेत .म्हणूनच तर हे ज्या वेळेसहि कोणी यांना यांचा समाज विचारतो त्या वेळेस हे जयभीम सांगतात किंवा आंबेडकर सांगतात किंवा आंबेडकरवाद सांगतात .धर्मांतर त्यांनी केलेच नाही किंवा त्यांची आजही तशी मानसिकता नाही त्यासाठी काही उदाहरणे द्यावी लागतील.बाळाचे   नाव ठेवतांना ब्राम्हणाला विचारने,लग्नाचा मुहूर्त पाहणे ,शनीला घाबरणे ,सटवी चे तायीत बांधणे,करदोरा घालणे(लाल किंवा काला ) , लग्नात बाबासाहेबाचा व बुद्धाचा फोटो ठेवणे पण मंगळसूत्र घालणे ,बाजा लावणे ,हळद लावणे , देवांचे फोटो, मूर्ती घरात ठेवणे ,भिक्शुला लग्न लावायला लावणे ,जोडू घालणे वगैरे वगैरे  ह्या सर्व हिंदू धर्माच्या प्रथा आहेत पण हे लोक मानतात म्हणजेच हेच लोक बाबासाहेबांच्या विचारांना पहिले लाथ मारतात .आणि वरून आंबेडकरवादाचा आव आणतात .
               या सारखे कित्येक विषय आहेत .हा छोटासा खटाटोप त्यांच्या साठी आहे जे लोक आंबेडकरांशी बेईमानी करत आहेत कृपा करून त्यांना माझी विनंती ह्या सारखे प्रकार सोडा आणि आंबेडकरांचे कार्य पुढे जाईल या साठी पाउल उचलन्याकडे लक्ष द्या .आंबेडकरांच्या डोक्यावर अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढायचा बाकी आहे.वेळ अजून गेलेली नाही ,आणि कृपा करून असा समज करू नये कि मी फक्त लिहिलेय तर हि माझी उठावाची सुरुवात आहे .