शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

हिंदू धर्मातील हिंदूच नसलेले वर्ग


वर्ण व्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेले वर्ग ह्यात बऱ्याच लोकांत भ्रम निर्माण झाला आहे. शुद्र , अतिशूद्र  ह्यातला फरक तसेच ह्या धर्मात कोणती सामाजिक वर्ग मोडतात ह्या बद्दल सुद्धा बऱ्याच प्रमाणात गोंधळ निर्माण होतो . गम्मत आहे ती हि म्हणजे वर्ण व्यवस्था सोडून इतर लोक हिंदू म्हणताच येऊ शकत नाही. तस म्हणायला गेले तर हिंदू हा मुळात धर्मच नाही पण आज रोजी काही का असेना त्यास कागदोपत्री धर्म म्हणून मान्यता मिळाली व त्यास आज भला मोठा समाज स्वतः चा धर्म समजतो. हिंदू धर्म ह्या शब्दास हिंदू विद्वानांनी फार विरोध केला पण शेवटी तो शब्द माथ्यावर येऊन पडलाच . म्हणूनच दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला होता ते सुद्धा हिंदू हा शब्द घेण्यास विचारात पडले असावे.  तसे हिंदू धर्माची स्थित्यंतरे कालानुरूप होत गेली .वैदिक धर्म , ब्राम्हणी धर्म आणि आजचा हिंदू धर्म . धर्म असे म्हटले तर वास्तविक हिंदू चे कोणतेही विशेष असा धर्मग्रंथ नाही .स्थापना कधी झाली ? ह्याची कोणतीही माहिती अस्तित्वात नाही . त्याला धर्म हा शब्द हि विद्वान द्यायला कचरतात . तरी भोळ्या भाबड्या जनतेमुळे तो टिकून आहे . इ.स.१८०० च्या आधी हिंदू हा शब्द क्वचितच वापरण्यात येत असावा . पण आज रोजी तो धर्म म्हणून लोकांच्या माथी मारण्यात आला आहे .
   शूद्र - हिंदूंचा सर्वात जुना ग्रंथ ऋग्वेद . त्यातील पुरुषसुक्त मध्ये चार वर्ण जन्माला घातले गेले . ब्राम्हण , क्षत्रिय , वैश्य , शुद्र . असमानता ह्या विषयाची सुरुवात ह्या धर्मात येथूनच होते वास्तविक वेदांची संख्या आधी ३ होती त्याच प्रकारे वर्ण सुद्धा तीन होते शुद्र वर्ण आधी अस्तित्वात नव्हता . १८५० ते १९५० ह्या १०० वर्षात च्या कालखंडात बरीच वर्तमान पत्रे ,मुखपत्रे ,पुस्तके ह्यात ब्राम्हण मंडळींनी सरळ सरळ आजच्या काळात फक्त २ वर्ण शिल्लक आहेत ते म्हणजे ब्राम्हण आणि शूद्र अस सिद्ध करण्यासाठी खटाटोप चालवला . त्यातला एक वाद म्हणजे शाहू महाराजांना शूद्र ठरवले . ब्राम्हण , क्षत्रिय आणि वैश्य यांनी शूद्र समाजावर अन्याय अत्याचार केलेत त्यांना फार हीन वागणूक मिळाली . असा प्रचार नेहमी होत असतो पण नेमका शूद्र वर्ण म्हणजे कोण ? आजचा इ.मा.व. म्हणजे OBC आणि SBC हा पूर्वीचा शूद्र पण ते लोक सरळ ह्या भ्रमात जगतात कि अस्पृश्य म्हणजे शूद्र . शूद्र लोक हिंदू म्हणता येतात काय ? वास्तविक हिंदू धर्माची धर्मात येण्यास कोणतीही पद्धत अस्तित्वात नाही . हिंदू धर्म म्हणजे वर्ण आणि जातींचा धर्म आहे असे म्हटले तर काही वावगे ठरू नये. शूद्र वर्ग कधीही हिंदू नाही कारण त्यांचा उपनयन विधी होतच नसतो . धर्म शास्त्रे जर तपासली तर ज्या माणसाचा उपनयन विधी होईल तो हिंदू पण उपनयन विधी नाकारल्या मुळेच शूद्र वर्ण अस्तित्वात आला .म्हणजे ते हिंदू उरतच नाही.कागदोपत्री जरी ते हिंदू म्हणून वावरत असले तरी हिंदू शास्त्रांप्रमाणे ते हिंदू ठरत नाहीत .म्हणजे ते ज्या धर्माला आपला मानतात त्या धर्माची शास्त्रे त्याला आपल्या पासून वेगळे अस्तित्व देतात . ह्या धर्माबाहेर ढकललेल्या लोकांना हिंदू धर्माला चिकटवून ठेवण्यासाठी ब्राम्हणी व्यवस्थेने ह्यांच्या साठी पुराणोक्त पद्धत तयार केली. न त्यांच्या समारंभात वापरली . ते जर ह्या धर्माचे असते तर त्यांना शास्त्रे शिकवण्यासाठी हिंदू व्यवस्थेने अडचण केलीच नसती पण इतकी साधी गोष्ट पण लक्षात येऊ नये हे विशेष कदाचित धर्माचा पगडा , न श्रद्धा न अंधश्रद्धा ह्या चक्रात अडकल्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होत नसावी . हिंदूंची सेवा करण्यासाठी निर्माण केलेला वर्ग तो शूद्र .असो कधीतरी त्यांना ह्यातील सत्य कळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही . पण व्यवस्थेने लाथ मारलेली असतांना सुद्धा त्यांच्याशी प्रामाणिक राहण्याचे इतर उदाहरण भारताशिवाय इतर देशात भेटणार नाही हे नक्की .
   हिंदू व्यवस्थेने शुद्र सोडून अजून तीन विशिष्ट प्रकारच्या वर्गाला जन्म दिला . १ ) गुन्हेगार जमाती ‘ २ ) रानावनात रहाणाऱ्या जमाती व ३ ) ज्यांना स्पर्शच करता येणार नाही असा वर्ग
अशा वर्गांना जन्म देणारी जगातली एकमेव न नीच संस्कृती हिंदू आहे अस म्हटले तर नक्कीच चुकीच होणार नाही . म्हणूनच प्रबोधनकार केशव ठाकरे आपल्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे ह्या पुस्तकात म्हणतात “आजचा हिंदू समाज हा ‘समाज’ ह्या नावाला कुपात्र ठरलेला आहे .हिंदू धर्म हे भले मोठे भटी गौडबंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिनबुडाचे पिचके गाडगे या पेक्षा यात विशेष असे काही नाही .”  आता आपण ह्यातील ३ ) ज्यांना स्पर्शच करता येणार नाही असा वर्ग ह्यावर दृष्टीक्षेप टाकू .
   ह्या वर्गाला सुद्धा आम्ही हिंदू आहोत अशी जाणीव सतत होत असते पण हे हिंदू कसे ठरतील ? कारण हिंदू धर्मात तर फक्त चार वर्ण समाविष्ट होतात यांना तर हिंदूंची धर्मग्रंथे मान्यता देऊच शकत नाही त्यामुळे न यांचे काही संस्कार आहेत न कोणती धर्म पद्धती . हा वर्ग आज भारतात अनुसूचित जाती म्हणजे Scheduled Cast  ह्या वर्गात मोडतो .यांचा हिंदू धर्माशी कोणताच संबंध नाही. यांना हिंदू लोक अस्पृश्य मानत . यांची घरे गावाच्या बाहेर आज सुद्धा आढळतात. शूद्र वर्ग पेक्षा सुद्धा हीन न दीन यांची परिस्थिती होती.हिंदू धर्माने यांना कधीही जवळ भटकू दिलेले आढळत नाही .हिंदू वर्ग गायीला पवित्र मानत होता न ह्या लोकांचे उद्योग गायीच्या मांस , कातडे ह्याशी संबंधित आहेत . म्हणजे हि लोक हिंदूंच्या अगदी विरुद्ध कार्य करत होते. तरी भारत प्रजासत्ताक झाल्या नंतर यांच्या अशिक्षित पणा मुळे हे नकळत हिंदू गणले गेले. आजच्या काळात गणिते बदलली म्हणून लोकसंख्या जास्त म्हणून हिंदू विद्वानांनी यांना भूलथापा देत जवळ केले. ज्या धर्म व्यवस्थेने यांना लाथ मारली ती धर्म व्यवस्था आज यांना आपलीशी वाटू लागली . मातंग समाजाची चिकित्सक मुक्ता साळवे प्रस्थापित समाज व्यवस्थेला प्रश्न विचारात होती आमचा धर्म कोणता ? आज त्याच वर्गाची माणसे तिला नकळत उत्तर देत आहेत आम्हाला ज्या व्यवस्थेने हि दयनीय अवस्था दिली तोच आमचा धर्म . हिंदू व्यवस्थेने ह्या वर्गाला राजकीय ,सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक अशा सर्व विकासापासून थांबवून ठेवले . कित्येक पिढ्या न पिढ्या वर खालच्या दर्जाचे काम लादण्यात आले. खालच्या दर्जाचे काम करणेच यांनी भूषण समजून घेतले न आज पण ते आमच्या पूर्वजांचे काम आहे असे म्हणत ते काम अंगावर घेण्यातच हे लोक धन्य मानत असतात. त्या खालच्या वर्गाचा यांना गर्व आढळतो . हिंदू संस्कृती गर्व करण्याचेच शिकवते जो ज्या वर्गात आहे , जातीत आहे त्याला त्याचा गर्व असला पाहिजे आणि खालच्या वर्गाची घृणा हिच हिंदू व्यवस्थेची शिकवण आहे . हिंदू ग्रंथांचा आधार घेतला तर यांना अपवित्र घोषित केले गेले आहे . हिंदूंची कोणतेही धर्मग्रंथे ह्यांना हिंदू मानत नाहीत . कागदो पत्री हे जरी हिंदू म्हणवून घेत असले तरी हिंदू धर्माच्या धार्मिक पातळीवर हे हिंदू नसून हिंदू धर्माच्या बाहेर राहून हिंदूंची घाणेरडी कामे करणारे गुलाम आहेत न आज सुद्धा हि गुलामी स्वीकारण्यासाठी हे तयार आहेत हे नवल . हिंदू वर्णात निर्माण केलेला सर्वात खालचा वर्ग शूद्र सुद्धा यांना अपवित्र मानतो . जरी प्रजासत्ताक भारतात अस्पृश्यता कायद्याने बंद असली तरी ती हिंदूंच्या धार्मिक ग्रंथात आहेच त्यामुळे हिंदू धर्मीय लोक शास्त्राप्रमाणे आज सुद्धा अस्पृश्यता मान्य करणारच हि सहज बाब आहे . ह्यात नवल असे काही नाही . हिंदूंची धर्मग्रंथच त्यांना घृणा करणे शिकवतात . हिंदू लोक वाईट नसून त्यांना अमानुष बनविणारे त्यांचे ग्रंथ वाईट आहेत . जर असे नसते तर आज च्या काळात सुद्धा ह्या वर्गावर हिंदूंचे अत्याचाराची उदाहरणे घडलीच नसती . हिंदूंची ग्रंथ हि ईश्वराची आज्ञा असल्यामुळे हिंदूंना मान्य करणे हि सुद्धा सहज गोष्ट आहे . ज्यांना वर्णात स्थानच नाही ते कसे हिंदू स्वतः ला म्हणवून घेतात हेच कळत नाही . पेशवाईच्या काळात यांची सावली पडणे सुद्धा अपवित्र मानले गेले . जगात कोणत्या वर्गावर अत्याचार झाले नसावे इतके अमानुष अत्याचार ह्या वर्गावर पेशवाईच्या काळात केले गेलेत. कित्येक किल्ले न वाड्यांच्या पाया मध्ये पूर्ण अस्पृश्य कुटुंब चे कुटुंब बळी दिले जायचे .तसेच काही अस्पृश्य समाजाच्या स्त्रीवर अमावस्येला बलात्कार करणे शुभ मानले जायचे .त्याने धन योग असतो असा समज व्यवस्थेत होता . ह्या वर्गास बहिष्कृत वागणूक हिंदू संस्कृती ने दिली . जनावरांना सुद्धा अशी वागणूक हिंदू धर्म देत नव्हता ती वागणूक हिंदू धर्माने ह्यांच्यावर लादली . एवढे असून सुद्धा आज हा हिंदू नसलेला वर्ग स्वतः ला फक्त हिंदू म्हणवून घेत नाही तर त्याचे प्रतिनिधत्व सुद्धा ठीक ठिकाणी करायला कमी करत नाही . कधीतरी हा वर्ग चिकित्सक होऊन हिंदूंचे ग्रंथ तपासेल न ह्या धर्माला लाथ मारेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही .
   २ ) रानावनात रहाणाऱ्या जमाती – ह्यास आजच्या प्रजासत्ताक भारतात अनुसूचित जमाती म्हणजेच Scheduled Tribe असे नामकरण करण्यात आले आहेत . साध्या भाषेत आदिवासी . ह्या वर्गास आम्ही हिंदू आहे असे नेहमीच वाटत असते . आता पहिला न महत्वाचा प्रश्न हा आहे कि हिंदू धर्मात तर जाती आहेत पण जमाती च काय ? ह्या वरून निदान ह्या वर्गाला काही तरी समज आली पाहिजे होती हिंदू धर्मात जमाती नाहीत . जमातींची स्वत: ची संस्कृती आहे . पण ती त्यांनी मिटवून हिंदूंची संस्कृती स्वीकारली . झाडांची पूजा करणारे लोक आता निर्जीव दगडांची पूजा करायला लागलेत . जमाती ह्या शब्द वरून ह्यांनी हे अंदाज बांधायला हवे होते . पण हे लोक इतरांच्या संस्कृतीत मश्गुल झालेत . वास्तविक आम्हाला धर्म नाही मग जो लादला तो प्रेमाने घेतला . अशी गत ह्या लोकांची झालेली आहे अस म्हटले तर चुकीचे ठरणार नाही . आजच्या बदललेल्या युगात ह्यांचे जग म्हणजे रान राहिलेले नाहीत पोटापाण्यासाठी हे लोक आता शहरात वसायला लागली पण आपले स्वतंत्र अस्तित्व सोडून ज्या हिंदू व्यवस्थेने , संस्कृतीने यांना रानावनात हाकलेले त्या संस्कृतीचे हे लोक दास होणे पसंद करतात . हिंदूंना यांचा एवढा तिटकारा होता कि यांना ते लोक गावात सुद्धा येऊ देत नसत . हिंदूंचे असे वागण्याचे कारण काय होते ? हे त्यांना शोधायची गरज राहिलेली नाही. आपला विकास होत आहे आपण शिक्षित होत आहोत ह्या अविर्भावात हे जगत असतात .पण आपल्या पूर्वजांना झालेल्या यातना , कष्ट विसरून ज्या संस्कृतीने त्यांना लाथा मारल्या त्यातच रममाण होणे त्यांना भाग्याचे वाटते. ज्यांना धर्म नाही त्यांनी आपला धर्म कोणता हवा हे ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होतेच पण शेवटी कोणत्या संस्कृतीत जायचे हे सुद्धा शिक्षित झाल्यावर पण ठरवता येऊ नये हे विशेष . हिंदू धर्मात आज सुद्धा यांना जागा नाही . ब्राम्हणांनी शुद्रांसाठी तयार केलेल्या पुराणोक्त पद्धती त्यांना ह्यांच्या साठी वापरायला अडचण नसावीच न शेवटी कितीही काही झाले तरी हिंदू धर्मापासून हे विभक्त व्हयला नको हि सवर्ण विद्वानांची इच्छा होतीच कारण हिंदूंची लोकसंख्या कमी व्हायला नको . ब्राम्हणी व्यवस्थे मुळे यांना प्रगती करता येऊ नये हि नेहमी व्यवस्था ठेवलेली होतीच त्याच उत्तम उदाहरण म्हणजे द्रोणाचार्य ने एकलव्याचा अंगठा कापून घेतला होता. जर एकलव्य मोठा धनुर्धर झाला असता तर अर्जुनाला आव्हान आले असते हि गोष्ट द्रोणाचार्यांना नको होती. अनुसूचीत जाती ला किमान गावाच्या बाहेर तरी राहू देत होते पण यांना तर तिथे हि व्यवस्थेने जागा दिली नाही . ह्यावरून हिंदूंना यांचा किती भयानक तिटकारा होता हे लक्षात यायला वेळ लागणार नाही.प्राचीन हिंदूंच्या ग्रंथात यांना कुठेही अशी जागा ठेवलेली नाही कि हे लोक हिंदू व्यवस्थेत येतील . कागदोपत्री जरी हिंदू झाले असले तरी कितीही काही झाले तरी हिंदूंचे धर्मग्रंथ अंतिम निर्णय असेल न तो म्हणजे हिंदू धर्मात स्थान नसणे .असो अपेक्षा करुया कि ह्या लोकांना कधी तरी आपला धर्म कोणता याचे उत्तर शोधता येईल .
   ३) गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जमाती – हिंदू संस्कृती एवढी निर्दयी ठराली कि , तिने एक असा वर्ग जन्माला घातला कि ज्यांचा व्यवसाय दरोडे टाकणे , चोरी करणे असे गुन्हे करायचा व्हावा . निर्दयता आणि अमानुष पणा चा अतिरेक येथे झालेला आढळतो . दरिद्रता ह्या समाजावर मोठ्या भयानक प्रमाणात लादण्यात आली त्यातील नाईलाजाने हा वर्ग ह्या सारखे गुन्हे करण्यास प्रवृत्त झाला . आजचे भटके विमुक्त जमाती म्हणजे VJNT च्या वर्गात ह्या जमाती मोठ्या प्रमाणात आढळतात . याचे उदाहरण उचल्या पुस्तकावरून लक्षात येईन . यांच्या कित्येक पिढ्या हिंदू संस्कृतीने गिळंकृत केल्यात पूर्ण समाजात यांना गुन्हेगार म्हणून पहिले जाते . हि परिस्थिती हिंदू व्यवस्थेने यांना दिली . एका गावात यांचा ठाव ठिकाण नसायचा कारण यांचे व्यवसाय एका गावात टिकून राहण्यासारखे नव्हते . ह्या समाजापैकी आज पण कित्येक लोकांचे रेशन कार्ड नसते . प्रजासत्ताक झालेल्या ६२ वर्षानंतर सुद्धा ह्यातील बहुतेक लोक भारतीय नागरिकतेचा पुरावा देऊ शकत नाही . इतके असून सुद्धा हे लोक आज हिंदू मध्ये ढकलण्यात आले . न आज रोज अज्ञानतेमुळे हे लोक स्वतः ला हिंदू समजू लागलेत . जे शिकलेले नाहीत त्यांनी नकळत असेल पण बरेच शिक्षित आज रोजी आम्ही हिंदू चा टेंभा मिरवू लागलेत . ज्या हिंदू धर्माने एवढे अन्याय अत्याचार केलेत त्याचे हे लोक मानसिक गुलाम होऊन पूजा करायला लागलेत आपल्या पूर्वजांचे संस्कार यांनी बहुतेक प्रमाणात त्याग करून टाकले आहेत . ह्यांच्या जातींची यादी सुद्धा आज पर्यंत शासनाला लागत नसते . एवढे अन्याय न अत्याचार हिंदू संस्कृती चे खपवून हे लोक हिंदू असू शकतील काय ? जे लोक हिंदू आहेत त्यांचे स्पष्ट उल्लेख त्यांच्या ग्रंथात बऱ्याच ठिकाणी आढळतात . पण इतरांचे काय ? ह्या लोकांच्या वस्त्यांवर आज सुद्धा हिंदू समाज हल्ले करत असतो काही ठिकाणी यांची परिस्थिती सुधारलेली आहे तर काही ठिकाणी अगदी हलाखीची आहे .
   स्त्री वर्ग – ह्या वर्गाच विशेष म्हणजे स्त्री कोणीही असो पण ती शूद्रच असते असे स्पष्ट कृष्णाने गीतेत म्हटलेले आहे . तसेच उपनयन स्त्रियांसाठी नाहीच . तिच काम ते फक्त दास्यत्व . मनुस्मुर्ती नुसार तर स्त्री ज्या वेळेस जन्माला येते त्या वेळेस तिचा मालक बाप असतो लग्न झाल्यानंतर तिचा पती तिचा मालक ( म्हणूनच मराठीत नवऱ्याला धनी हा शब्द सुद्धा आहे ) न मेल्या नंतर तिचा मुलगा तिचा मालक असतो . कुलदीपक साठी मुलगाच हवा कारण तो मालकी हक्क गाजवू शकतो . केशवपन , सती , बालविवाह ह्या सारख्या असंख्य प्रथा स्त्री वर लादल्या गेल्यात . तरी आजची आमची स्त्री स्वतः ला हिंदू म्हणवून घेण्यात लाज बाळगत नसून गर्व बाळगते . हिंदू धर्म व्यवस्थेत स्त्रीला काय स्थान होते हे सर्व स्त्रियांना माहिती असेलच . शूद्रांना शिकवणे हे महापाप मानले गेले आहे तरी यांना सावित्रीबाई फुले उपकार करती स्त्री वाटतच नाही . यांना सावित्री बाई फुले , ज्योतिबा फुले , महर्षी कर्वे , डॉ . आंबेडकर यांच्या वाढदिवस आठवत नसतात पण वटपोर्णिमा , दीपावली , मकरसंक्रांती ह्या सारखे गुलामीचे सण आठवतात . मंगळसुत्र , जोडू , ह्या सारखे गुलामीचे प्रतीके घालणे आज सुद्धा यांना अभिमानाचे वाटते . गुलाम बनवलेल्या हिंदू धर्मात आज पर्यंत यांना गर्व च आहे न उलट पतीची सेवा करणे न पतीला परमेश्वर मानणे हि हिंदू संस्कृती त्यांना मोलाची वाटते . हुंद्यासारखी प्रथा ज्या हिंदू धर्मात जन्माला येते न स्त्रियांचे जीव घेते तेव्हाही त्यांना हिंदू धर्माची लाज वाटत नाही . स्त्रीभृण त्या सारखी संस्कृती जन्म घेते ज्या संस्कृतीत त्या हिंदू धर्म यांना योग्य आहे . ह्या स्त्रिया जर हिंदू असत्या तर हिंदू धर्माच्या ग्रंथात यांच्या साठी एवढे आपत्ती जनक विधाने येण्याचे कारण तरी कळेल का ? स्त्री हिंदू असूच शकत नाही . कारण हिंदूंच्या सर्व ग्रंथात स्त्री बद्दल फारच खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे तसेच तिला अपमान वाटावा , न पूर्ण जीवन त्रासात जावे अशी व्यवस्था धर्म ग्रंथांनी केलेली आहे . जेवढ्या प्रथा हिंदू धर्मात जन्माला आल्या त्या सर्व फक्त धर्म ग्रंथामुळे आल्या .
   आजचे OBC , SBC , SC , ST , VJ-NT ह्या पैकी कोणताही समाज हा हिंदू कधीच नव्हता त्यात पण आज रोजी हे लोक हिंदू धर्माचे प्रतिनिधत्व अगदी जोरात करतात . हिंदूंचे उपवास , सणवार यांच्या अंगात यायला लागलेत . हिंदू संस्कृती कोणत्या दर्जाची आहे हे ह्यांना कळत नसेल अस शक्य वाटत नाही . शूद्र म्हणजे आजचे OBC व SBC यांना उपनयन नाकारल्या मुळे ते ४ थ्या वर्णात ढकलले गेले परिणामी ते हिंदू ठरत नाहीत . उपनयन होत नसल्या कारणाने विद्यारंभ ह्या संस्काराचा अधिकार आपोआपच गेला .ते पूर्ण पणे दास झाले होते त्यांच्या संपत्ती वर पूर्ण पणे ब्राम्हणांची अधिकारशाही असेल अशी व्यवस्था आधीच धर्म ग्रंथांनी करून ठेवली होती . संपत्ती मध्ये पत्नी सुद्धा येते त्यामुळे कुण्या शुद्र ची स्त्री आवडल्यास तिचा भोग कधीही ब्राम्हण करू शके . गायींना पवित्र मानणारा हिंदू समाज वैदिक काळात गायी खाण्यात अग्रेसर होता . ज्याच्या कडे जितक्या गायी तो तितका श्रीमंत अशी संस्कृती हिंदू समाजाची ह्या साठीच होती . अगदी १९५० पर्यंत सुद्धा गावात हि संकल्पना दिसेल . गायीच्या वासराचे मांस फार गोड लागते अशा स्वरूपाच्या ऋचा ऋग्वेदात आढळतात .तसेच यज्ञ करते वेळे हिंदूंनी कोणता प्राणी बळी देण्यासाठी सोडला असेल हे सांगणे मोठे कठीण काम आहे . बळी दिलेला प्राण्याचे मांस सर्व लोक मौजेने खायचे. ऋग्वेदात यज्ञात गायी मोठ्या प्रमाणात कापल्या जायच्या याचे पुरावे आहेत . गायीला पवित्र मानणारे हिंदू गायीचे मांस खाण्यात एके काळी अग्रेसर होते .अंगारकी चतुर्दशी च्या दिवशी शूद्र स्त्रीने ब्राम्हण देवास अंग दान करण्याची पद्धत होती . अश्वमेध यज्ञ चार वर्ष पर्यंत चाले. त्या चार वर्षात राण्या घोड्या सोबत संभोग करायच्या असे यजुर्वेदात म्हटले आहे .वेद हे अश्लीलतेचा कळस आहे आजची अश्लीलता वेद वाचल्यानंतर फार कमी आहे इतके भयानक प्रकार एके काळी आर्य समाजात चालत होते. अगदी जवळचा प्रकार म्हटला तर दुसऱ्या बाजीरावच्या काळात घटकंचुकी नावाचा स्त्रियांची चोळी काढून लपवायचा खेळ शनिवार वाड्यात चाले . दुसऱ्या बाजीरावाला ज्याची बायको आवडली ती वाड्यावर रात्री पोचत असे . त्यास कंटाळून कित्येक लोकांनी त्या काळात पुणे सोडले होते . शूद्रांनी जर ब्राम्हण कडे पाहून थुंकले तर त्याची जीभ कापून टाकण्या इतपत शिक्षा होत होत्या. शुद्र लोकांना हत्यार घेऊन लढण्याचे अधिकार नव्हते . समुद्रात जाणे पाप मानले जायचे . अशा हिंदूंच्या धार्मिक समजुती मुळे भारताचे फार नुकसान झाले आरमारी सैन्य ठेवणारे छत्रपती शिवाजी हे कदाचित हिंदू धर्मातील पहिले प्रशासक असावे . छत्रपती शिवाजी यांना ह्याच हिंदू व्यवस्थेने शूद्र ठरवले .शूद्र माणूस राजा होऊ शकत नाही ह्या हिंदूंच्या धर्मिक्तेमुळे छत्रपतींच्या विरोधात कित्येक लोक गेले. राजे संभाजी यांची बदनामी केली गेली व खुनापर्यंत षडयंत्र गेले . मराठ्यांची सत्ता पेशव्यांनी खाल्ली . किल्ले आणि जुने वाड्यात अस्पृश्य समाजाचे पूर्ण कुटुंब ची कुटुंब बळी दिली जायची . गावात सणावाराला अस्र्पुष्य कुटुंबाला खड्यात टाकून वरून पूर्ण गावाने दगड मरे पर्यंत मारायचे . मेल्यानंतर त्या कुटुंबाला तिथेच गाडून टाकले जायचे , पेशवाईच्या काळात अस्पृश्य लोकांवर झालेल्या अन्यायाची रीघ लागते . सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यास त्यांना मज्जाव असे . त्यांची पाणी भरण्याची जागा वेगळी असायची . एवढेच नव्हे तर त्यांची वस्ती गावाच्या बाहेर असायची .त्यांचा स्वाभिमान येथ पर्यंत मारून टाकण्यात आला होता कि गुलामी करणे हेच त्यांना महत्वाचे काम वाटू लागले होते . अमावास्येच्या दिवशी मातंग स्त्रीचा भोग केल्याने धन संपत्ती प्राप्त होते . अशा वावटळी हिंदू ग्रंथांनी पसरवल्या मुळे अस्पृश्यांच्या स्त्रियांवर बलात्काराचे प्रमाण वाढलेले होते . अस्पृश्यांच्या स्त्रियांना हाथ लावतांना हिंदू लोकांना कधीच अस्पृश्यता आड आली नाही . स्वातंत्र्याच्या काळापर्यंत अस्पृश्य लोकांना चांगले कपडे घालणे , पायात चांगले बूट घालणे , घोड्यावरून वरात काढणे , स्टील पितळाचे भांडे घेणे असल्या करणा वरून मारहाण होत होती . इतके अन्याय अत्याचार करणारी हिंदूंची व्यवस्था संस्कृती म्हणून किती खालच्या पातळीवर गेली होती हे ज्याचे त्याने ठरवावे .हिंदू संस्कृती मध्ये स्त्रियांना सती जाण्यास भाग पाडले त्या साठी प्रेताजवळ ढोल , ताशे वाजवले जायचे कारण स्त्री जरी ओरडत असली तरी तिचा आवाज पसरू नये . असा एक काळ होता कि नवरा मेल्यानंतर स्त्री ची इच्छा असो अगर नसो तिला सती जावेच लागत असे . बालविवाह केल्यामुळे नवरा अधिक वयाचा असे तो लवकर मरण पावत असे . त्या वेळेस कित्येक स्त्रियांवर तिच्याच नवऱ्याचे नातेवाईक बलात्कार करत असावेत अथवा संबंध ठेऊन घेत असावे . विधवा झालेली स्त्री जर गरोदर झाली तर ती आत्महत्या करून घेत असे . अशा स्त्रियांसाठी ज्योतिबा फुले यांनी पाळणाघर काढले होते जेणे करून त्या स्त्रिया गुपचूप बाळंत व्ह्याच्या न निघून जायच्या . त्यातला एक मुलगा म्हणजे डॉ.यशवंत .सावित्री वर दगड धोंडे फेकणारा हाच हिंदू समाज . स्त्रियांच्या शिक्षणास विरोध करत होता . ज्या ज्योतिबा फुले यांनी आपल सर्वस्व समाजासाठी दिले त्यांच्या परिवाराची अगदीच दयनीय अवस्था झाली . एका प्लेग झालेल्या अस्पृश्य मुलाला कोणी उचलून न्यायला तयार नव्हते म्हणून सावित्री माई फुले यांनी उचलले व दवाखान्यात घेऊन गेल्यात . त्यातच त्यांना प्लेग झाला व त्या मरण पावल्या . डॉ.यशवंत हे सुद्धा जास्त काळ जगले नाहीत . त्यांची पत्नी लक्ष्मी बाई हिने दारिद्रतेमुळे फुले यांचा वाडा १०० रुपयाला विकला . न पुण्यात एका मंदिरात आसरा नसल्या कारणाने वारल्या . त्यांची मयत नगरपालिकेने केली . हिंदू व्यवस्थेने त्यांना कोणतीच मदद केली नाही . इतकी भयानक परिस्थिती त्यांनी फक्त समाजासाठी काढली . अशा हिंदू व्यवस्थेला काय म्हणावे ? चक्रधर स्वामी ह्यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली . त्यात अस्पृश्य व स्त्रियांना खुला प्रवेश होता . अस्पृश्यांसाठी विहिरी काढल्यात तसेच वेगवेगळ्या सुधारणा केल्यात . ह्याचा राग येऊन यादवांच्या सेनापतीने त्यांना विष देऊन मारून टाकण्यात आले . चोखोबा महार पांडुरंगाच्या भक्तीत विलीन झाला पण त्याला मंदिरात प्रवेश दिला नाही म्हणून त्याची समाधी आज सुद्धा बाहेर आहे . डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री आणि शूद्र वर्गाच्या उन्नती साठी हिंदू कोड बिल मांडले पण डॉ.आंबेडकर यांना स्त्री उन्नतीचे श्रेय भेटू नये ह्या उद्देशाने कॉंग्रेसने ते मंजूर होऊ दिले नाही . डॉ.आंबेडकर यांनी ह्या संदर्भात हिंदू चे पुढारी पंडित मालवीय यांना घरी बोलावले व त्याचे कारण विचारले असता मालवीय म्हटले “ डॉ.आंबेडकर तुमचे बिल जर मंजूर झालेत तर एक स्त्री कुणालाही फारकत देऊन कित्येक लग्न करू शकेल. मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या देशात हे योग्य नाही ” त्यावर डॉ.आंबेडकर यांनी दिलेले उत्तर फार मार्मिक आहे .डॉ .आंबेडकर म्हणतात . “ तुमचे मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या वडिलांना किती बायका होत्या ? रामाने सीतेला एका धोब्याच्या म्हणण्यावर गरोदर असतांना सोडून दिले आणि स्वतः ला सिद्ध करायच्या नादात तिला आत्महत्या करायला भाग पाडले जर तो आरोपी म्हणून उभा असता न त्यावेळेस मी त्या न्यायालयाचा न्यायाधीश असता तर त्याला फाशीच दिली असता . तुमचे अजून एक देव आहेत कृष्ण त्यांच्या किती बायका होत्या ?” मालवीय डॉ.आंबेडकर यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत . देवांच्या भानगडीत मला शिरायची इच्छा नाही . पण असल्या धर्मात चिकटून गुलामी करत राहणे यात काय हशील होणार ? ज्या धर्माने गुलामी , लाचारी , मरण येत नाही तिथ पर्यंत दरिद्रता दिली असल्या संस्कृतीचा गर्व बाळगता येईल काय ? यांचे सण सुद्धा मानसिक गुलामीची प्रतीके आहेत . हिंसेची प्रतीके आहेत असल्या हिंसेचे , गुलामीचे समर्थन करता येईल काय ? हिंदूंचे देव सुद्धा हिंसेचे , व्यभिचाराचे , लोभाचे प्रतिक आहेत ह्यांचे समर्थन करून काय फायदा आहे . ज्याने त्याने खालोखाल विचार करून ठरवावे . 
अभिजित गणेश भिवा .

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१२

धम्मचक्र प्रवर्तन दिन कोणता ?

  नेमका धम्मचक्र प्रवर्तन दिन कोणता ? १४ ऑक्टो. कि दसरा ? असे गोंधळ हल्ली काही लोकांनी निर्माण केले आहेत त्याचा उलगडा करण्याचा हा एक प्रयत्न .
       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दसरा ह्या दिवशी दिनांक १४ ऑक्टोंबर १९५६ ला बुद्ध धम्माची दीक्षा घेतली . त्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय अपेक्षित होते दसरा कि दिनांक हा गोंधळ वास्तविक म्हणजे होण्यासारखा नाहीच आहे . तरी काही मंडळींनी विनाकारण हा गोंधळ निर्माण करून बौद्ध समाजाची दिशाभूल केलेली आहे . दसरा ह्यास दुसरा शब्द म्हणजे अशोक विजयादशमी . फक्त ह्या दोन गोष्टींचा विचार केला तर अगदीच स्पष्ट आहे कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दसरा ह्या दिवसाशीच संबंध होता. आता ह्या दिवसाचे महत्व आपण तपासून पाहूया .
      १४ ऑक्टोंबर १९३४ ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्धाचे चारित्र्य भेट देणारे त्यांचे गुरु कृष्णाजी केळूसकर यांचा मृत्युदिन तसेच दिनांक १३ ऑक्टोंबर १९३५ ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली . त्यानुसार कृष्णाजी केळूसकर यांची २२ वि पुण्यतिथी व धर्मांतराची घोषणा केल्यानंतर बरोबर २१ वर्षानंतर चा दिवस म्हणजे १४ ऑक्टोंबर १९५६ . ह्या दोन गोष्टींचा विचार केल्यास १४ ऑक्टोंबर तारीख महत्वाची वाटते . दसरा हा दिवस म्हणजे अशोक विजया दशमी ह्या गोष्टीचा विचार केला तर दसरा हा दिवस महत्वपूर्ण वाटतो . सम्राट अशोक ने त्या दिवशी बुद्ध धम्म ची दीक्षा घेतली . तसेच १९५६ ह्या दिवशी २५०० वि वैशाख पौर्णिमा आहे . ह्यानुसार १९५६ ला महत्व प्राप्त होते . ह्या सर्व गोष्टी चा विचार केला असता दसरा दिनांक १४ ऑक्टोंबर १९५६ हा दिवस अत्यंत महत्वाचा होता . म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या दिवशीच दीक्षा घेतली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेचा परिचय कदाचित निवडलेल्या दिवसावरून अगदी योग्य व्हावा . ह्या गोष्टींचा विचार केला असता नेमके डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तारीख महत्वाची होती कि दसरा हा गोंधळ माजतो .
    ह्या गोंधळाला मिटवण्यासाठी आपण ह्याची प्रत्येक बाजू तपासण्याचा प्रयत्न करुया . प्रथम केळूसकर गुरुजी च्या पुण्यतिथी चा विचार करुया . कृष्णाजी अर्जुन केळूसकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु . त्यांच्या मुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लक्ष बुद्ध धम्माकडे गेले . पण त्यांचे एवढ्या ऐतिहासिक घटनेला एकट्याला उद्देशून बाबासाहेबांना जर कार्य करायचे असते तर त्यांनी तसे जाहीर केले असते पण तसे जाहीर न करणे म्हणजे ते महत्वाचे कारण म्हणता येत नाही . बाबासाहेबांनी कुठेही तसे जाहीर केले नाही कि मी बुद्ध धम्माची दीक्षा केळूसकर गुरुजी च्या पुण्यतिथी च्या दिवशी घेत आहे म्हणून हा मुद्दा मागे पडतो . दुसरा भाग तो १३ ऑक्टोंबर १९३५ ह्या दिवशी घोषणा केली त्यास १४ ऑक्टोंबर १९५६ ला २१ वर्ष पूर्ण होतात पण ह्या गोष्टीचा सुद्धा जाहीर उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आढळत नाही . त्यामुळे ह्या दोन्ही शक्यता कितपत योग्य म्हणाव्या ? २९ सप्टें.१९५६ ‘प्रबुद्ध भारत’ ह्या साप्ताहिकात पहिल्या पानावर आर. डी. भंडारे यांचा लेख आहे त्या लेखात वर्णन असे , “ १९३५ साली डॉ. बाबासाहेबांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेन पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे , तिची पूर्तता २१ वर्षानंतर होत आहे .” पण असे काही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले कुठेही आढळत नाही .पण तरी हा एक पुरावा म्हटला पाहिजेच कारण प्रबुद्ध भारत हे साप्ताहिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नजरेखालून जाऊनच तयार होत असावे किंवा नंतर वाचनात नेहमी येत असावे पण त्यास त्यांनी महत्व दिलेले आढळत नाही . न दुसरी विशेष गोष्ट म्हणजे हा मुद्दा आर .डी. भंडारे यांनी तिसऱ्या बातमीत अगदी दोन ओळीच्या ‘प्रतिज्ञाची पूर्ती’ ह्या शीर्षका खाली आटोपला आहे त्या अर्थी त्यांनी हि ह्यास खास असे महत्व दिलेले आढळत नाही .
    आता तिसरी आणि महत्वाची बाब म्हणजे दसरा . ह्या वर .दिनांक २९ सप्टें.१९५६ ;प्रबुद्ध भारत’ ह्या अंकात काय काय होते ? प्रबुद्ध भारताच्या अंकाची सुरुवातच त्या अंकात सम्राट अशोकाच्या नवव्या शिलालेखाने केली गेली . प्रबुद्ध भारताचा अंकात डाव्या बाजूला वरती बाबासाहेब आंबेडकर यांचा सुविचार असायचा तर उजव्या बाजूला विचारवंतांचे सुविचार असायचे ह्या अंकात उजव्या बाजूला वरती सम्राट अशोकाचा नवव्या शिलालेखाचे विचार दिले आहेत .ते असे .
“ दान करणे पुण्य कारक आहे परंतु धर्म दानाची तुलना करता येईल असे दुसरे कोठलेही दान नाही म्हणून मित्र , हितचिंतक , आप्त ,सोबती यांनी एकमेकास आग्रहाने हे पुण्यदायक कर्तव्य करण्यास सांगितले पाहिजे . – सम्राट अशोक (नववा शिलालेख)” हे वाचले असता जणू डॉ.बाबासाहेब हे दान करणार व त्यांचे अनुयायी सुद्धा करणार असेच वाटते.
त्याच पानावर मुख्य बातमी “ धर्मचक्राच्या नव प्रवर्तनासाठी चलो नागपूर डॉ. बाबासाहेब यांचा बौद्ध दीक्षा समारंभ विजयादशमी १४ ऑक्टोंबरच्या सुप्रभाती” आता ह्या बातमीत विजयादशमी ह्या शब्द येण्याचे कारण काय ? दिनांक देणे हा भाग अगदीच सामान्य आहे . साधा बौद्ध पौर्णिमेचा उल्लेख जर करायचा असला तर ह्या वर्षी बौद्ध पोर्णिमा अमुक ह्या तारखेला येत आहे असाच कोणीही माणूस उल्लेख करेल ह्यात नवल नाही . तसेच कोणतीही पोर्णिमा , अमावस्या ह्या दिवशी निश्चिती सांगायची असेल तर आपण त्यासोबत तारीख सुद्धा सांगणारच ह्यात तारीख ओघाने येत असते .ह्या बातमीचा लेख लिहिणे येथे गरजेचे आहे . तो पुढे देत आहे .
    भारतीय बौद्धजन समितीचे प्रवर्तक आणि अध्यक्ष ,भारतातील दलित जनतेचे कंठमणी , अंतरराष्ट्र कीर्तीचे घटना – पंडित ,अखिल भारतीय शे.का.फेडरेशन चे संस्थापक आणि कर्णधार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी येत्या १४ ऑक्टोंबर १९५६ च्या सकाळी ८ वाजता नागपूर येथे बौद्ध धर्म दीक्षा घेण्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे ,
   ‘प्रबुद्ध भारत’ च्या संस्थापकांना एक विशेष संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाठविला असून बौद्ध धर्म स्वीकारावायाचा वर दिलेला दिवस, तिथी आणि समय कळविला आहे .
    विजयादशमीच मुहूर्त धर्मदिक्षेसाठी साधण्यात अत्यंत औचित्य आहे . विजयादशमी हि बौद्ध सम्राट महान अशोकाच्या विजयाचा दिन म्हणूनच पाळली जाते .अलीकडील तीनशे वर्षात पावसाळ्याच्या समाप्ती नंतर मराठे सिमोल्लोघन या विजयादशमी ला करीत असत . अस्पृश्य आणि दलित समाजाच्या डोक्यावर गेली हजार वर्षे जे काळेकुट्ट ढग जमले होते ते या अडीच हजाराव्या बौद्ध वर्षाच्या विजयादशमीला धर्मचक्र नवप्रवर्तन करून डॉ. बाबासाहेब नष्ट करणार आहेत . हिंदू धर्माच्या सिमामध्ये बंदिस्त अस्पृश्य समाज या दिवशी त्यांना शतकानुशतके गुलाम ठेवणारी धार्मिक तटबंदी उल्लंघून नव स्वातंत्र्याचे उदक पिण्यास तयार होणार आहेत . हेच ते खरे सीमोल्लंघन ते केल्यावर परत यावयाच नाही , या भीम निश्चयाने प्रत्येक अस्पृश्य दलितांचे पाउल पुढे पडणार आहे .
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्धधर्म दीक्षा समारंभ ब्रम्हदेशचे महास्थवीर पूज्य भिक्षु चंद्रमणी संपन्न करणार आहेत .त्याचवेळी दहालाख लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरला एकत्र येतील .
    नागपूर शहरात पूर्व दिशेकडून रायपूर , दृग , गोंदिया ,भंडारा या जिल्ह्यातून धर्म स्वीकारेच्छुक बौद्ध जन प्रवेश करतील , पश्चिम देशेकडून वर्धा , अमरावती ,अकोला , बुलढाणा या जिल्ह्यातून येणारे धर्म प्रवासी प्रवेश करतील तर दक्षिणेकडून मराठवाडा , चांदा ,बल्लारशाह ह्या विभागातील बौद्ध यात्रे करू येतील आणि उत्तर दिशेकडून उत्तर प्रदेश , मध्य भारत , भोपाल ,हुशांगाबाद , बैतुल , शविणी आदी विभागातील जनता पथकापथकाने समारंभाच्या जागेकडे बुद्धं ,शरणं ,गच्छामि च्या घोषणा करत येतील .
    ह्या प्रसंगी वर्धा आणि इतर मार्गातील सवर्ण हिंदूंचा एक प्रचंड गट बौद्ध दिक्षेसाठी येणार आहे .दीक्षा प्रसंगी पांढरे शुभ्र कपडे परिधान केले पाहिजे . व दीक्षा घेणाराचे वय १८ वर्षापेक्षा अधिक असले पाहिजे . हे नियम कसोशीने पाळले जातील .
    त्याच दिवशी संध्याकाळी नागपूर येथेच डॉ. बाबासाहेबांचे बौद्ध धर्म स्वीकारावरील ऐतिहासिक भाषण होणार आहे . जगाच्या धार्मिक इतिहासातील या क्रांतिकारक घटनेचे प्रत्यक्ष अवलोकन करण्याची संधी व त्यात भाग घेण्याचे महद् भाग्य आपल्याला लाभलेले आहे असे सांगतात कि , भ.बुद्धानंतर प्रथमत:च एकावेळी , एकदिवशी , एकेठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने बौद्ध धर्म स्वीकार केल्याचे कोठेही नमूद नाही .
                     नागपूरचे वैशिष्ट्य
    १९३० साली ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीगची स्थापना ,तदनंतर १९४२ साली अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची मुहूर्तमेढ डॉ. बाबासाहेबांनी नागपूरला केली . तसेच बौद्ध धर्म स्वीकारण्याचा समारंभ नागपूरलाच होणार .
                     प्रतिज्ञेची पूर्ती
    १९३५ साली डॉ . बाबासाहेबांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेन पण हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली आहे , तिची पूर्तता २१ वर्षानंतर होत आहे .- आर. डी . भांडारे ( प्रबुद्ध भारत ,साप्ताहिक , मुंबई , शनिवार ता. २९ सप्टेंबर १९५६ – बौद्ध वर्ष २५०१)
      हा पूर्ण लेख येथे दिला आहे ह्या वरून अगदी सिद्ध होऊन जाते कि डॉ.बाबासाहेब यांनी संपादकीय मंडळीला महत्व पूर्ण संदेश दिल्यावरून हा लेख त्यास उद्देशून लिहिला आहे . ह्यात दसरा म्हणजेच विजयादशमी ह्या दिनालाच महत्व दिलेले आढळते . प्रतिज्ञेची बातमी तिसऱ्या अगदी दोन ओळीत संपवण्यात आली आहे. तसेच ह्यात बाबासाहेब यांचा संदेश सुद्धा दिलेला आहे तो पुढे नमूद करतो .
              डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश
                     २६ ,अलीपूर रोड ,
     दिल्ली ता.२३ सप्टेंबर १९५६
     बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे .येत्या दसऱ्यास तारीख १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे .
     या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजता माझा धर्म दीक्षा विधी समारंभ होईल, व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी जाहीर व्याख्यान होईल.
              बी.आर. आंबेडकर २३-९-१९५६
आता हा संदेश नीट अभ्यासला पाहिजे . ह्या ठिकाणी दिवस हा आधी 'दसरा' हा शब्द प्रयोग केला आहे म्हणजे डॉ.आंबेडकर यांना दसरा हा दिवस अपेक्षित आहे . साधी समज आहे कि दिवस मुक्रूर केला म्हणजे तारीख द्यावी लागेल त्या अर्थी बाबासाहेब यांनी पुढे तारीख दिली आहे. त्या तारखेला खास असे महत्व कोठेही त्यांनी नमूद केलेले नाही पण ‘दसरा’ हा शब्द त्यांनी स्पष्ट नोंदविलेला आहे . व त्यावर जोर दिलेला सुद्धा दिसतो . त्यामुळे त्यांचा विचार येथे अगदी स्पष्ट होतो . 
        प्रस्तुत विषय आणि त्यास हवे ते योग्य पुरावे मी दिलेले आहे तरी धम्म चक्र प्रवर्तन दिन हा दसराच मानावा असा डॉ.आंबेडकर यांचा मानस हि स्पष्ट होतो तरी काही महाभाग आजही १४ ऑक्टोंबर ह्या दिवसाचा प्रचार करतात . ज्यांना माहिती नसेल ते ठीक आहे पण माहिती असूनही फक्त आपले पक्ष , संघटना यांच्या नेत्यांच ऐकून प्रचार करणारे खूप महाभाग आहेत . ते आंबेडकर द्रोह करत आहेत ह्यात शंका नाही .तसेच अशा बुरखा पांघरलेल्या लोकांना आंबेडकर वादी समाजाने कणखर विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे . अन्यथा माहित असूनही विरोध न करणे म्हणजे आंबेडकरद्रोह ठरू नये का ? तरी समाजात गैरसमज पसरविणे बंद करून दसरा ह्याच दिवशी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ मानावा व साजरा करवा .न जे लोक समाजाला चुकीची दिशा दाखवत असतील असल्या मुर्ख लोकांना महत्व देऊ नये ते लोक मुद्दाम दुफळी माजवू पाहत आहे काही राजकारणाच्या नावावर तर काही समाजसुधारणेच्या नावावर .
धन्यवाद .
अभिजित गणेश भिवा . 

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

गोयंका गुरूजी और कांशीराम जी ने बाबासाहब डॉ. आंबेडकर की धम्मक्रांति पर रोक लगायी है ?


         बहोत बड़े मुद्दे पर मत रखने जा रहा हू | शायद मेरे मत से किसी के विचारों को चालना मिली तो वही मेरी लेख लिखने की सफलता होगी | गोयंका गुरूजी ने बर्मा से भारत में विपश्यना साधना लायी | क्या उनकी विपश्यना आदमी को बौद्ध बनाती है ? क्या बाबासाहब को अपेक्षित बुद्धिझम का मार्ग यही है ? क्या बाबासाहब को अपेक्षित बुद्धिझम विपश्यना को बौद्ध धम्म का महत्वपूर्ण अंग की स्वीकृति प्रदान करता है ? सायकल पर घुमकर कांशीराम जी ने आन्दोलन को बढ़ाया | क्या कांशीराम जी ने बौद्ध धम्म को बढाने का कार्य किया है ? क्या उनका आन्दोलन बाबासाहब की धम्मक्रांति को समर्पित है ?
         गोयंका गुरूजी जो विपश्यना साधना ही बुद्ध के धम्म का महत्त्वपूर्ण अंग घोषित करते है , जब की विपश्यना साधना से सामाजिक फायदा क्या है ? ये बात मेरे समझ में नहीं आती | अत : उनके कथन के अनुसार वे शील ,समाधी और प्रज्ञा इस मार्ग को बुद्ध का मार्ग घोषित तो करते है पर वे उसे विपश्यना में बंदिस्त कर देते है | शील ,समाधी और प्रज्ञा इन तीनों शब्दों में अष्टांगिक मार्ग को दिखाया जाता है | क्या व्यक्ति को १० दिवशीय शिविर करावा कर खुद के अंगों में एकाग्रचित्त करके स्वतंत्रता ,समता ,बंधुता ( करुणा ) ,मैत्री ,शील इनकी समाज में प्रस्थापना होगी ? “ बुद्ध ने महान सामाजिक सन्देश दिया |” ऐसा बाबासाहब कहते है | तो क्या विपश्यना उस सामाजिक सन्देश को समाज में प्रस्थापित कर सकती है ? बाबासाहब ने बड़ी दिक्कत और मशक्कतो के बाद अपने अनुयायियों को बुद्ध का मार्ग प्रदान कर उन्हें एक सही प्रगति की दिशा दी | और सभी को धर्मांतर करने का हेतु प्रदान किया | पर गोयंका गुरूजी के अनुसार अगर देखे तो धर्मांतर करने की आवश्यकता तो होती ही नहीं है , बुद्ध का मार्ग तो आप जो धर्म में है वहा से भी पालन कर सकते है | अब गोयंका गुरूजी को यह कैसे समझाए की आज के युग में धर्म का क्या क्या महत्व है ? बुद्ध धम्म तो समयानुसार परिवर्तनशील होता है | आज के दौर में शैक्षणिक , आर्थिक , सामाजिक ,राजनैतिक ऐसे सभी क्षेत्रो में धर्मो का प्रभाव बारीकी से देखने के लिए मिलता है | कुछ लोगो का कहना है की गोयंका गुरूजी सच्चे बौद्ध धम्म को आगे बढा रहे है | तो उन लोगो से पुछना चाहूँगा की ,फिर बाबासाहब ने क्या झूठे बौद्ध धम्म की दीक्षा ली ? क्या गोयंका जी को ऐसा साबित करना है की , कागजी तौर पर अगर लोग बुद्धिस्ट नहीं होते तो भी चलता है ? विपश्यना से आदमी को मात्र अकेले में अगर अभ्यास करना है तो अकेले का धम्म व्यक्तिगत हो जायेगा | बुद्ध का धम्म नीतिमान समाज की निर्मिति करने के लिए है , न की एक जगह स्वस्थ बैठकर समाज से बैराग प्राप्त करने के लिए | गोयंका गुरूजी की साधना आदमी को एकांतवास की आदत लगाती है | १० दिवसीय शिविर ,से लेकर ३ महीने तक के शिविर के दौरान इंसान को एकांत में रहने की आदत हो जायेगी |तथागत बुद्ध ने कहा? किस सुत्त में विपश्यना उपासक ने करनी चाहिए ऐसा कहा है ? अगर नहीं कहा तो फिर उन्होंने ऐसे क्यों नहीं कहा ? बुद्ध ने अपने भिक्षु संघ को हर बात स्पष्ट रूप से बताई है | बाबासाहब ने धर्मांतर करने के बाद घोषणा की थी की “ मैं पूरा भारत बौद्धमय करूँगा | ” तो गोयंका गुरूजी को कौनसा भारत बौद्धमय करना है ? गोयंका गुरूजी के उद्देश को देखे तो उन्हें " भारत बौद्धमय नहीं " “ भारत विपश्यनामय करना है |” | धर्मांतर के पीछे बाबासाहब का एक बड़ा ध्येय ये था की धर्म का असर आनेवाली पीढ़ी पर पड़ने की संभावनाए ज्यादा होती है | पंथ या सम्प्रदाय अपनाने से आनेवाली पीढ़ी उसे अपनाने की संभावना कम होती है | उदा. के तौर पर अगर किसी के पिताजी वारकरी संप्रदाय से हो तो लड़का - लड़की भी वारकरी संप्रदाय को मानेंगे ऐसा नहीं कहा जा सकता | विपश्यना करने वाले व्यक्ति के लड़का - लड़की विपश्यी ही होंगे ऐसा बहोत ही कठिन है | पर मुस्लिम ,हिंदू , ख्रिश्चन , बौद्ध के लड़का - लड़की ज्यादातर वही धर्म में रहना पसंद करते है | उसी तरह संस्कार की बात है , आनेवाली पीढ़ी पर धर्म के संस्कार डालने के लिए आदमी जितना उत्साही दिखाई देता है उतना संप्रदाय या पंथ के लिए नहीं दिखाई देगा | विपश्यना साधना सिखना और करना दस दिवसीय शिविर में शील पालन करना इतने में ही सिर्फ धर्म कभी नहीं हो सकता | इससे आदमी के अंदर नकारात्मक प्रवृत्ति का जन्म होने की संभावनाए अधिक है | विपश्यना साधना से दुनिया के बंधन त्यागने की इच्छा होती है | गृहत्याग की इच्छा जगती है | इंसान धीरे धीरे एकांत प्रिय होने लगता है | और धीरे धीरे बाबासाहब के मिशन से दूर होते दिखाई देता है | कोई भी विपश्यी धर्मांतर करना महत्वपूर्ण नहीं समझता | बाबासाहब को अपेक्षित बुद्ध धम्म सामाजिक क्रांति है पर विपश्यना उसे रोकती है |विपश्यना करने वाले व्यक्ति धर्मांतर विरोधी होने लगते है | गोयंका जी तो कहते है विपश्यना करने से लोग बुद्ध बनेंगे क्या गोयंका जी आज तक बुद्ध बन गए ? इस लिए ये काफी विश्वास से कहा जा सकता है की गोयंका गुरूजी के विपश्यना के मार्ग ने बाबासाहब के धम्मक्रांति पर निश्चित रूप से रोक लगाईं हुई है | इस लिए हर आदमी भलेही अनुभव के लिए इसे अवश्य करे पर गोयंका गुरूजी या फिर विपश्यना का प्रभाव स्वयं पर करना मतलब बाबासाहब के धम्मक्रांति के प्रति स्वयं को नकारार्थी स्थिति में लेकर जाना निश्चित है |
          कांशीराम जी ‘ बामसेफ ’ सामाजिक क्षेत्र में और ‘ बसपा ’ राजनैतिक क्षेत्र में इन दो देश के महत्वपूर्ण संघटनाओ के जनक है | इन दो संघटनाओ को रचाने के लिए उन्होंने व्यक्तिगत बहोत परिश्रम भी किये | पर इन दो संघटनाओ के प्रचार करते वक्त वास्तविक अपनी राजनीती को फैलाते हुए उन्होंने जातीयता को बढ़ावा दिया है ये बात किसी भी हालत में नकारी नहीं जा सकती | “ मैं बुद्ध धम्म की दीक्षा लूँगा |” ऐसा उन्होंने कहा था और धम्म के नाम पर उन्होंने काफी चतुराई से राजनीति भी की | भारत देश प्रजासत्ताक लोकतंत्र होने के बाद तिन प्रकार की शक्तिया ही देश के राजनीति में महत्वपूर्ण भूमिका रख सकती थी ( १ ) मो.क.गाँधी ( २ ) वि.दा. सावरकर ( ३ ) बाबासाहब डॉ .भी ,रा. आंबेडकर उसमे की गाँधी जी की शक्ति के रूप में कांग्रेस बलवान थी | सावरकर का घना प्रतिनिधित्व भाजपा कर रही थी | बाबासाहब का प्रतिनिधित्व करने की जगह रिपाई ने अपने अंदर के झगडो के चलते खो चुकी थी इस बात का पूरा फायदा कांशीराम जी ने उठाया | और बाबासाहब का नाम लेकर सामाजिक और राजनैतिक शुरुवात की | अपनी राजनीती के लिए उन्होंने O.B.C , S.C , S.T. , V. J . N .T. को एक कतार में लाने के लिए ‘ बहुजन ’ इस शब्द का प्रयोग किया | अगर उन्हें बाबासाहब का आन्दोलन चलाना होता तो वे ' रिपब्लिक ' यह बाबासाहब की संज्ञा उस वक्त तक इस्तेमाल कर सकते थे पर उन्होंने ऐसा नहीं किया | राजनीती के लिए उन्होंने बुद्ध धम्म की उपाधि मिल चुके बोधिसत्व डॉ. बाबासाहब आंबेडकर जैसे महान व्यक्तिमत्व को बिरसा मुंडा , अन्ना भाऊ साठे , पेरियार रामास्वामी नायकर ऐसे अनेक नेताओं के साथ खड़ा कर दिया | और बाबासाहब के साथ साथ उन्हें भी महापुरुष घोषित कर दिया | उनके आन्दोलन को लोग जुड़े इस लिए हर जाती का एक महान पुरुष बनाकर बाबासाहब की बराबरी में खड़ा किया गया | चमार समाज के लोगो को आन्दोलन में खींचने का जरिया रविदास जी को बनाया , मातंग समाज के अन्ना भाऊ साठे , आदिवासी भाइयो के लिए बिरसा मुंडा | आपके समाज का महान इतिहास है ऐसे हर समाज के आदमी से कहा गया | इससे उनके मन में अपने जाती के प्रति अहंकार की वृद्धि हुई | वास्तविकता वे लोग आंबेडकरवाद की तरफ ना झुककर अपने समाज के जातीयता के अहंकार से अपने महापुरुष की तरफ झुके | इसलिए चमार समाज का आदमी जय रविदास के बाद जयभीम , मातंग समाज का आदमी जय अन्नाभाऊ साठे बोलने के बाद जयभीम , आदिवासी बांधव जय बिरसा बोलने के बाद जयभीम कहने लगे | इस तरह से हर आदमी की जाती का बड़ा इतिहास बताना , उन जाती के लोगो का उस विशिष्ट समाज के प्रति अहंकार बढ़ना इस वजह से उन्हें बुद्ध धम्म में दीक्षा लेने की जरुरत नहीं रही | जो बाबासाहब हिंदू धर्मं पर पूरी जिंदगी पूरी ताकद से विरोध करते आये क्योकि वो असमानता पर आधारित है | बाबासाहब ने अपने ग्रन्थ ,भाषणों में हिंदू के धर्म ग्रन्थ पर गहरी आलोचना की |' रिडल इन हिन्दुझम ' जैसी माहान किताबे लिखाकर हिंदू धर्म के भगवान और ग्रन्थ का भेद खोला | इन बातो पर कांशीराम जी राजनीति के चलते कभी भी आग ना उगल सके क्योकि बहुमत प्राप्त करने का शायद उन्हें बड़ा लालच हो | उनकी बनाये हुए बामसेफ नामक संघटन तो पहले से ही खुद को NON RELIGIOUS घोषित कर रखा है | मतलब ये बात तो स्पष्ट है की उन्हें बुद्ध धम्म से कोई लेना देना नहीं | ना ही वे लोग बुद्ध की प्रतिमा रखते है | उनका लक्ष्य तो सिर्फ “ सारे समाज को एकजुट करके ब्राम्हण समाज पर आक्रमण करना इतनाही नजर आता है |” क्या यह कार्य आंबेडकरवाद या बुद्ध धम्म से सम्बंधित है ? ' बहुजन ' शब्द की उत्पत्ति बुद्ध के धम्म से हुई है ऐसा इनका कहना है | ये बात सही भी है पर बुद्ध ने ऐसे संकुचित वृत्ति से बहुजन इस शब्द का प्रयोग नहीं किया | बाबासाहब ने अपने किसी भी संघटन का नाम बहुजन क्यों नहीं रखा ? कांशीराम जी की बामसेफ पूरी तरह से हिटलर और मार्क्स से प्रेरित दिखाई देती है | हिटलर की किताब ‘ मेरी लढाई ’ में आधे से ज्यादा पन्ने पर वो बहुजन शब्द पर जोर देता है | हिटलर का आन्दोलन जर्मनी में यहूदी लोगो के खिलाफ चलाया गया इनका आन्दोलन ब्राम्हण के खिलाफ चलाया जा रहा है | हिटलर अपने भाषण के दौरान अपने खुद के संघटन के लोग कम्युनिस्टों ने अंदर कुछ कम ज्यादा नहीं करना चाहिए इसलिए लाठी वाले रक्षक रखता था उसी प्रकार वामन मेश्राम जी भी रखते है | ‘ बुद्धिस्ट रिसर्च सेंटर ‘ की प्रतिस्थापना करना ये सिर्फ कांशीराम जी का दिखावा है | वास्तविक उस संघटना ने बुद्ध धम्म को बढ़ाने का कोई कार्य नहीं किया | वास्तविकता यही है की कांशीराम जी ने बुद्ध धम्म और बाबासाहब को अपनी राजनीति में फायदा उठाने के लिए इस्तेमाल किया | अगर ऐसा नहीं होता तो आज तक बाबासाहब के महत्व पूर्ण स्थल को उन्होंने पार्टी का पैसा लगाकर उद्धार किया होता |
         इसलिए यक़ीनन गोयंका गुरूजी और कांशीराम जी ने बाबासाहब डॉ. आंबेडकर की धम्मक्रांतिपार रोक लगायी है | आज तक इन लोगो ने कोई भी दीक्षा समारोह पर कभी भी अपना लक्ष केंद्रित नहीं किया | बाबासाहब डॉ. आंबेडकर की धम्मक्रांति में ' धम्म दीक्षा ' को असाधारण महत्व है | और इन लोगो ने इस मुद्दे को नजरअंदाज ही किया है | अगर इन्होने आज तक अम्बेडकरी विचारों को साथ लेकर चलना ही होता तो वे लोग ' धम्मादिक्षा ' के समारोह करवाते जैसे की बाबासाहब ने करवाए | अगर इनकी रोक को उठाना है तो इनका साथ देना इस बात को छोडने और अपने दिमाग को जागृत करने के लिए बाबासाहब और बाबासाहब द्वारा दिए बुद्ध के साहित्यों का अभ्यास कर धम्म मार्ग को बढाने की जरुरत है | बाबासाहब के साहित्य पढ़े बिना बुद्धा की और बढ़ने की कोशिश न करे इससे सभ्रम हो सकता है| अभ्यास करने की वजह से इनका आन्दोलन किस तरह गलत हो रहा है ये साफ़ हो जायेगा | इन दोनों लोगो की वैचारिकता में बाबासाहब के धम्म मार्ग को धुन्दला कर रखा है | जिस वजह से धम्मक्रान्ति के मार्ग पर आगे की राह देखने में कठिनाइया महसूस होने लगी है | ये वे शत्रु है जो दिखाई नहीं देते | इनका आन्दोलन इन्होने पूरी तरीके से अम्बेडकरी विचारों को तोड़ - मरोड़कर फैलाया हुआ है | आंबेडकरवादी समाज की सबसे बड़ी जरुरत ये है की इन जैसे शत्रु का सामना करने के लिए अपनी शैक्षणिक , आर्थिक , सामाजिक और राजनैतिक विकास की सीडिया बनाए | और बाबासाहब की धम्मक्रान्ति पर अपने कदम बढाए | बाबासाहब की धम्मक्रान्ति को आगे बढाने के लिए हमे हर क्षेत्र की श्रेष्ठ संघटनाओ की जरुरत है | जो की शैक्षणिक , आर्थिक , सामाजिक और राजनैतिक इन जैसे मुद्दों पर कार्य करे | धम्म को बढाने के लिए हमें इस दिशा में सोचने की जरुरत है | (कोशिश होगी की इस विषय पर आगे भी मेरे लेख आपके विचारो को गति अवश्य दे और आपके हा प्रश्न का समाधान हो|)
धन्यवाद
(यह जानकारी अधिकांश लोगो तक पहुचने तथा सही अम्बेडकरी आन्दोलन को आगे बढाने हेतु शेयर करे | शेयर करने से बाबासाहेब डॉ. आंबेडकर जी को अपेक्षित समाज निर्मिती हो सकती है||)
अभिजित गणेश भिवा