मंगळवार, २ ऑगस्ट, २०११

बौद्ध आणि महार ह्या समाजांचा आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह



( हिंदी के लिए अगली लिंक पर क्लिक करे |http://abhijitganeshb0.blogspot.com/2011/10/blog-post_18.html )
फार महत्वाच्या मुद्यावर विचार मांडण्याचे धारिष्ट्य करत आहे पण भविष्याच्या दृष्टीकोनातून ह्यावर ह्या समाजाने विचार करावा असे मला तरी आवश्यक वाटते .आधी तर बौद्ध आणि महार हे शब्द वेगळे आहेत हे मी स्पष्ट करू इच्छितो .पण ज्यांनी बौद्ध धम्मात धर्मांतर (ज्या धर्मात होते त्या जुन्या धर्माला सोडून विचार ,आचार , उच्चार आणि कागदोपत्री इ .सहित  ) केले नाही ते लोकही डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरुषामुळे बौद्ध धम्माचा अर्थ समजू लागले आणि त्यात आघाडीवर असणारा समाज तो महार आहे असे मला वाटते .मला ह्याचीही कल्पना आहे कि मी हे दोन्ही शब्द एकच ठिकाणी वापरले त्यामुळे बऱ्याच लोकांचा नाराजीचा सूर निघेल पण मला माझा मुद्दा त्यापेक्षाही अधिक महत्वाचा वाटतो .असो  |
      बौद्ध आणि महार समाज आज रोजी उच्च वर्णीय लोकांशी विवाह करण्याच्या निर्णय प्रक्रियेत सर्वात पुढे आहेत असे निष्कर्ष सध्या तरी काढता येत आहेत .आणि ह्याने भविष्याला फार मोठी कलाटणी मिळू शकते .त्यामुळे आज रोजी ह्या मुळे बरेच प्रश्न उभे झालेले दिसून येतात . दोन्ही समाजाच्या तरुणी विवाहित करून घेण्यात उच्च वर्णीय लोकांना मोठी अडचण जाणवते आणि ह्या दोन्ही समाजालाही मुली देण्यात अडचणच जाणवते पण ह्याच ठिकाणी उच्च वर्णीय लोकांच्या तरुणी मोठ्या प्रमाणात ह्या समाजांच्या तरुणांशी विवाह करतांना आढळून येतात .नेमके ह्या प्रकरणाने पुढील भविष्याला काय वळण मिळेल ? हा विचार आज रोजी फार महत्वाचा होऊन बसला आहे .मला तरी असे वाटते कि जे लोक बौद्ध झालेत त्यांना तर जातीव्यवस्था ह्या फाल्तुक गोष्टीशी काहीही संबंध उरलेलाच नाही .जातीव्यवस्था असणे हि हिंदू धर्माची सर्वात मोठी समस्या आहे आणि त्यांनी आंतरजातीय विवाह करणे गरजेच आहे पण मदद म्हणून आणि देशकार्य म्हणून जर बौद्ध समाज आंतरधर्मीय विवाह करून घेत असेल तर ठीक आहे .पण त्यांचा सरळ मार्गे तरी जातीव्यवस्थेशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही हे निश्चित आहे .
       आजचा बौद्ध आणि महार समाजाचा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करतांना आढळून येत आहे पण समस्या हि होऊन बसली आहे कि तो विवाह केल्यानंतर आपल्या समाजापासून दूर जाण्यात किंवा पाठ फिरवण्यात धन्य मानतो , असे का होते ? आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह हि बौद्ध आणि महार समाजासाठी भविष्यातील अडचण सिद्ध होऊन बसली आहे .हे कडवट पण सत्य आहे . ह्याचे कारण तरी काय ? ती तरुणी जी लग्न करते ती कि तो तरुण जो लग्न करतो तो ? वास्तविक आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह हा दोन संस्कृती , दोन वेगवेगळे समाज ह्यातील दुवा ठरतो ( इतरही खूप महत्व आहे ) पण हा बौद्ध आणि महार समाजासाठी विष ठरत आहे . नेमके याला कारण तरी काय ? ह्यातील दोष पाहून काहींनी तर येथ पर्यंत म्हटले आहे कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्राम्हण स्त्रीशी लग्न करायचा निर्णय चुकला होता ( प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष प्रकारे ) .मला अशी मते वाचल्यावर मोठा हसू येतो .जर आपल्यात सामर्थ्य नाही तर त्याचे खापर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यावर कसे फोडता येऊ शकेल ? वास्तविक माझ्या मते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निर्णय फक्त स्तुतीस पात्र नसून ऐतिहासिक कलाटणी देणारा ठरला आहे .नेमका फरक हाच आहे कि प्रज्ञा भाग बौद्ध आणि महार समाजाने अजूनही विकसित केलेला नाही (अपवाद असतील ) .माझे व्यक्तिगत मत असे झाले आहे कि आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करण्यास (उच्च वर्णीय समाजाच्या तरुण वर्गाशी ) अजून हि बौद्ध आणि महार ह्या समाजातील तरुण वर्ग परिपक्व झालेला नाही  (अपवाद असतील ) . परिस्थिती अशी होते कि येणारे मुल जे जन्मते ते आईच्या सहवासात सर्वात अधिक राहते .आणि आईने अजून हि देव , धर्म हि संकल्पना सोडलेली नसते .म्हणून त्याची आई त्याला ग म्हणजे गणपती आणि भ म्हणजे भटजी हेच शिकवते .त्या तरुणीचाचा जोडीदार तिला बौद्ध ( धम्म .अज्ञानातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग  ) बनवण्यामागे व तिचे मनपरिवर्तन करण्यामध्ये अयशस्वी झालेला असतो .किंवा त्याला बौद्ध पद्धत किंवा बौद्ध म्हणून काही देणे घेणे नसते हा आजचा निर्णय त्याच्या पुढच्या पिढीवर फार परिणामक सिद्ध होणार हे नक्की ह्यात दुमत होऊच शकत नाही .पण तो ह्या बाबतीत पूर्ण उदासीन दिसून येतो .तसेच जर ह्या समाजातील तरुणीने आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह केला असेल तर आपल्या जोडीदार पुढे तिचे काही एक चालत नाही त्याचा धर्म ,त्याचे देव ,त्याची जात ती शांत पणे स्वीकारून घेते .ती पूर्ण पणे आपल्या जोडीदाराच्या व सासरच्या मर्जी ,धर्म ,परंपरा , रुढी प्रमाणे वागायला तयार होते .ती आपल्या जोडीदाराचे स्वीकारते प्रथेनुसार परंपरा नुसार ,धर्मानुसार गुलाम होणे पसंद करते पण ज्या बुद्ध धम्मात स्वातंत्र्य ,समता ,बंधुता ,न्याय व असंख्य चांगले गुण आहेत तो तिला माहित नसतो किंवा ती बोलू शकत नाही किंवा बोलत नाही . त्याची गुलामीची प्रतीके सुद्धा वापरते . उदा.मंगळसूत्र ,जोडू ,कपाळावर कुंकू इ. आपल्या मुलाने जागृत राहिले पाहिजे ( ज्याचा आंतरजातीय विवाह झालेला आहे त्याचे पालक ) असे संस्कार त्याच्या आई वडिलांकडून त्याला भेटलेले नसतात .पर्यायी बौद्ध संस्कार त्याच्या वर झालेले नसतात .आणि त्यामुळे येणारी पिढी हि बौद्ध (अज्ञानातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग ) न होता दैव वाद ,परम्परा यात अडकत चाललेली दिसते .कल्पनेवर विश्वास , देवावर विश्वास त्यातूनच आले . ह्यावर ( ज्यांनी आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह केला आहे ) त्या व्यक्तीला जर विचारले तर त्याचे म्हणणे असे असते कि  तिला \त्याला  तिचा  धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य आहे . पण आपण त्या म्हणजे ज्याच्या सोबत विवाह केला त्याचे मन परिवर्तन करून किंवा हिंदू धर्म ( किंवा इतर ) हा एक कल्पनांनी भरलेला धर्म आहे हे सिद्ध करून देण्यात अपयशी ठरलो हे त्याला \तिला  लक्षात येतच नाही किंवा लक्षात घेण्याची त्याची गरज नसते . आणि परिणामी तो ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष्य करतो आणि येणारी पिढी भरकटत जाते .जे आज पर्यंत घडले तेच पुढे घडते .याचे उदा .द्यायची मला तरी काही गरज दिसत नाही .पण ह्या वर माझे एक मत नेहमीचे असे कि ,आंतरजातीय विवाह करणे हे नक्कीच चुकीचे नाही पण लग्न करण्याआधी जर आपन प्रेमप्रकरण ( हि आजकालच्या तरुण वर्गाची भावना आहे  ) जर करत असू तर नक्कीच आपल्याला त्या व्यक्तीचे मनपरिवर्तन करण्यासाठी खूप वेळ मिळतो .तो वेळ घेऊन आपण त्या व्यक्तीचे मनपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे .लग्नानंतरही खूप वेळ मिळतो पण आपण ह्या गोष्टीचा विचारच करत नाही .किंवा आपण त्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून युक्तिवाद करतो .स्वातंत्र्य आहे पण याचा अर्थ हा होत नाही का  ? कि , जे लोक असे करत असतील किंवा म्हणत असतील ते लोक आपल्या जोडीदाराने ह्या खोट्या गोष्टीतून बाहेर पडावे ह्या साठी जे जोडीदारा विषयीचे कर्तव्य आहेत त्या कर्तव्या पासून ते व्यवस्थित पलायन करतात ? तरी जर ह्या सर्व गोष्टींचा खालोखाल विचार केला तर माझे ह्यावर मत असे राहील कि , बुद्ध धम्मात किंवा आंबेडकरी तत्वज्ञानात जबरदस्तीला स्थान नाही .मनाने स्वीकारणे ,अनुभवातून जाणून घेऊन आणि पूर्ण चिकित्सक बुद्धीने स्वीकारणे ह्यालाच महत्व आहे तसेच जो चिकित्सक नाही जो धम्माला पारखत नाही तो बौद्ध होऊच शकत नाही किंवा म्हणताच येऊ शकत नाही म्हणून आधी आपण स्पष्टीकरण देऊ शकतो एवढे सामर्थ्यवान होणे गरजेचे आहे आणि आपल्या जोडीदाराला चिकित्सा केल्यानंतरच , अनुभव घेतल्यानंतरच स्वतः हून मनाने स्वीकारण्याची धम्मानुसार मुभा राहतेच . त्यासाठी बौद्ध आणि महार समाजाने आपल्या आपल्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये आधी इतके सामर्थ्य भरावे कि , बौद्ध धम्म (अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग ,एक जीवनशैली ,धर्म म्हणून नव्हे तर धम्म { मानवा मानवातील नितीमत्तेने चालणाऱ्या संबंधाविषयीचे तत्वे }म्हणून ) कसा योग्य आहे ? हे स्पष्टीकरण देण्याची प्रज्ञा विकसित झाली पाहिजे .आणि जर आई वडिलांचे संस्कार जर तसे झाले नसतील तर बौद्ध आणि महार तरुणाने \तरुणीने स्वतःच ते विकसित करावे आणि नंतरच आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करण्याचा विचार करावा नाहीतर उगीच स्वतः च्या समाजाचे भवितव्य कचऱ्यात टाकू नये . आधी आपण बुद्ध धम्माचा व्यवस्थित अर्थ सांगू आणि स्पष्टीकरण करू शकू अशी प्रज्ञा स्वतः मध्ये निर्माण केली पाहिजे .
        उच्च वर्णीय लोकांच्या तरुणी तसे आपले भविष्य तपासून पाहण्यात चतुर दिसून येतात कारण ह्या दोन्ही समाजामधील जो तरुण प्रगती करणार ,अशी शाश्वती त्यांना वाटते ते त्याच्याशीच लग्न करतात .आणि ह्या समाजातील एका तरुणीचे नशीब पेटवतात . ह्या समाजातील तरुणींची संख्या दिवस दर दिवस वाढत चालली आहे आणि प्रगतीशील असणाऱ्या तरुणांची मानसिकता ह्या समाजातील ( बौद्ध आणि महार ) तरुणींशी विवाह करण्याची नाही .ह्या सामाजातील तरुणी इतर समाजातील तरुणांशी विवाह करण्यात मागे आहेत . तरुणांची संख्या मात्र अधिक आहे .फक्त आपल्याला एक उत्तम जोडीदार मिळावा हि आशा बाळगून जर आपण विवाह करत असू तर मग पुढच्या पिढीचा विचार करणेही गरजेचे आहे कि , आपली पुढील पिढी आपल्याला कशी निपजवयाची आहे ? भूतकाळ आपल्या हातात नक्की नाही पण वर्तमानकाळात काय करायचे हे आपल्या हातात नक्कीच आहे .भूतकाळापासून अनुभव घेऊन वर्तमानकाळात कार्य केल्यामुळे भविष्य काय घडले पाहिजे हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असते . ह्या गोष्टीवर सर्व तरुण वर्गाने खालोखाल विचार करावा लेख वाढू नये म्हणून येथेच संपवतो अन्यथा बरेच मुद्यांचा उलगडा करता आला असता .
धन्यवाद
 { अभिजीत गणेश भिवा }